उन्हाळी बाजरी लागवड | बाजरी वाण, बीजप्रक्रिया, खत, पाणी, कीड व रोग व्यवस्थापन सविस्तर माहिती | Unhali bajari lagwad summer bajra | pearl millet

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

उन्हाळी बाजरी लागवड | बाजरी वाण, बीजप्रक्रिया, खत, पाणी, कीड व रोग व्यवस्थापन सविस्तर माहिती | Unhali bajari lagwad summer bajra | pearl millet
उन्हाळी बाजरी लागवड

बाजरी
(Bajra /Pearl Millet)
हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व महत्वाचे तृणधान्य
पीक आहे व त्याचा आहारात वापर आपले पूर्वज खूप वर्षापासून करत आहेत. बाजरीत
(Bajra
/Pearl Millet)
असलेल्या पोषण तत्वामुळे त्याचे आहारातील महत्व हे अनन्य
साधारण आहे. इतर तृणधान्यापेक्षा बाजरी हे पीक सर्वात जास्त ऊर्जा देते याशिवाय यामध्ये
प्रथिने
, स्ंनिग्ध पदार्थ, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम , व्हीटामीन बी-6 चे प्रमाण देखील असते.

 


परंतु
सद्यपरिस्थिति पाहता
, बाजरी (Bajra /Pearl
Millet)
या पिकाचे महाराष्ट्रातील क्षेत्र कमी होत चाललेले आहे आणि आहारातील
वापर देखील कमी होत चाललेला आहे. बाजरी
(Bajra /Pearl Millet) प्रमाणेच नाचणी, रागी, ज्वारी यांचे
देखील आहारातील प्रमाण हे कमी कमी होत चाललेले आहे. तर
, बाजरी(Bajra
/Pearl Millet), रागी, नाचणी (Red
Millet), ज्वारी (Jowar) या पोष्टिक तृणधान्य पिकांचे
आहारातील सेवन वाढावे यासाठी शासनाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष
(
International Year of Millets 2023) म्हणून साजरे करण्यात येत आहे.

 उन्हाळी
बाजरी लागवड तंत्रज्ञान :

उन्हाळ्यात
हवामान कोरडे असल्याने रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे धान्य व कडब्याची
गुणवत्ता चांगली मिळते. उन्हाळी हंगामातील उष्ण व कोरडे हवामान मुळे रोगांचा प्रादुर्भाव
कमी होतो धान्य व कडब्याची गुणवत्ता चांगली मिळते. जर
, संरक्षित पाण्याची सोय असल्यास, खरीप हंगामातील
बाजरी पेक्षा उन्हाळी बाजरी पासून जास्त उत्पादन मिळू शकते.  वेळेवर पेरणी केल्यास धान्य आणि कडब्याचे अधिक
उत्पादन मिळू शकते यासाठी खालील प्रमाणे उन्हाळी बाजरी लागवड तंत्रज्ञानाचा वापर करावा.

 


बाजरी
पिकासाठी आवश्यक जमीन :

जमीन  मध्यम ते भारी, पाण्याचा
निचरा होणारी जमीन असावी. जमिनीचा सामू (pH) हा 6.2 ते 8 असायला हवा.

 


पूर्वमशागत
:

जमिनीची
नांगराने १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी नंतर कुळवाच्या दोन पाळ्या
देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाची धसकटे
, काडी-कचरा, वेचून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या कुळवणी
अगोदर हेक्टरी 10-12 बैलगाड्या शेण खत शेतात पसरवून टाकावे
, म्हणजे
कुळवणी बरोबर ते जमिनीत सम प्रमाणात मिसळले जाते.

 


उन्हाळी
बाजरी पेरणीची योग्य वेळ :

उन्हाळी
बाजरी ची पेरणी ही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधी मध्ये करणे फायदेशीर ठरते.
पेरणी ही १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी नंतर पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट
येते.

 उन्हाळी
बाजरी वाण (Bajra Varieties):

उन्हाळी
हंगाम करिता बाजरी या पिकाचे फुले आदिशक्ती
, फुले महाशक्ति
या संकरीत जाती किंवा आय सी एम व्ही 221
, धनशक्ती या सुधारित
वाणांची निवड करावी. संकरीत वाणाचा कालावधी हा 80-85 दिवस आहे तर सुधारती वाणाचा कालावधी
हा 74- 78 दिवसांचा आहे.

 


बियाणे
प्रमाण व पेरणी पद्धती :

हेक्टरी
४ ते ५ किलो बियाणे पेरणीसाठी पुरेसे आहे. एकरी १.२ ते १.६ किलो प्रमाणित बियाणे
वापरावे. बाजरी पेरणी ही शेत वाफसा आल्यावर दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे
बी व खत एकत्र पेरता येईल. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. (म्हणजेच एक फूट) व दोन
रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून पेरणी करावी. पेरणी ही २ ते ३ सेंमी पेक्षा जास्त
खोलीवर करू नये.


बीजप्रक्रिया (Seed Treatment) :


२0 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया : (अरगट रोगासाठी) बीजप्रक्रिया केलेले
प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या
द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 2 किलो मिठ विरघळावे त्यात बियाणे
टाकून  पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके
बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा व तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले
बियाणे वेगळे करुन पाण्याने 2 वेळा धुवून सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

 

मेटॅलॅक्झील
३५ एसडी याची बीजप्रक्रिया
(गोसावी/केवडा रोगासाठी) : पेरणीपूर्वी बियाण्यास ६ ग्राम
मेटॅलॅक्झील ३५ एसडी प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर त्याची पेरणी करावी.

 

अझोस्पिरीलम
व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया : 
२५ ग्रॅम अझोस्पिरीलम प्रति
किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. तसेच स्फुरद विरघळविणा-या जिवाणूची २५ गॅम
प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

 
खत व्यवस्थापन
:

उन्हाळी
बाजरी पिकासाठी माती परीक्षण नुसारच खत मात्र द्यावी. मध्यम ते भारी जमिनीसाठी
हेक्टरी ५० किलो नत्र
, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो
पालाश आणि हलक्या जमिनीसाठी ४० किलो नत्र
, २० किलो स्फुरद
आणि २० किलो पालाश खतांचा अवलंब करावा.

 

पेरतेवेळी
अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश मात्रा द्यावी आणि उर्वरित अर्धे नत्र हे पेरणी
नंतर 30 दिवसांनी द्यावे.

 


पाणी
व्यवस्थापन :

पेरणी
झाल्या नंतर ४ ते ५ दिवसांनी हलके पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार व
पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६
पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

 


तण नियंत्रण :

दोन वेळा कोळपणी व आवश्यकतेनुसार एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. एकात्मिक तण
नियंत्रण पद्धतीमध्ये अॅट्राझिन तणनाशकाची (
atrazine herbicide) पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी फवारणी करावी.

 


कीड
व रोग व्यवस्थापन :

बाजरी
या पिकावर केसाळ अळी
, खोडकिडा व सोसे/हिंगे ही कीड प्रामुख्याने
आढळते.


केसाळ
अळी
 ही अळी पाने खाऊन फस्त करते तिच्या
नियंत्रणाकरिता मिथाइल पॅराथिऑन 2.0 % भुकटी हेक्टरी २० किलो याप्रमाणात धुरळावी. सोसे/हिंगे
याकरिता देखील मिथाइल पॅराथिऑन वापरावे.

 

खोडकिडा
या किडीमुळे वाढणारा शेंडे कुरतडले जाऊन येणारी पाने वेडी वाकडी कापल्यासारखी
येतात व वाढ खुटते तसेच कीड कणीस सुध्दा पोखरते. नियंत्रणाकरिता मेलॉथीऑन 50 % हे 14
मिलि प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे वापरावे.

 

अरगट
या रोगामुळे कणसात दाणे भरण्याऐवजी फुलो-यातून मधासारखा चिकट द्राव निघतो नंतर तो
काळसर व कठीण होत जातो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के
मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करुन पेरणी करावी. रोगट झाडे उपटून नष्ट करावीत
.

 

केवडा/गोसावी
:
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोपे हे लहान असताना पाने पिवळी पडून त्यावर चट्टे
पडून पान तपकिरी बनतात. अशा झालेल्या झाडांची वाढ खुटते व त्यांना अनेक फुटवे
फुटतात. दाणे न भर्ता कणीस बुवाच्या विस्कटलेल्या केसासारखे दिसते. या रोगाच्या
नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास मेटॅलॅक्झील 35 एसडी हे बुरशीनाशक 6 ग्राम प्रति
किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी. पेरणीनंतर 14 दिवसांनी पिकावर कॉपर
ऑक्सक्लोराईड फवारावे. आदिशक्ती व धनशक्ती हे वाण यास रोगप्रतिकारक्षम आहेत.काढणी
:
हातात कणीस दाबले असतं त्यातून दाणे सुटणे तसेच दातात दाणे दाबले असता कट्ट असा आवाज
आल्यास पीक कापणीस तयार आहे समजावे.उत्पादन
:
वरील प्रमाणे सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हेक्टरी धान्याचे 20-25 क्विंटल
आणि चार्‍याचे 5-6 टन उत्पादन मिळू शकते.


– Arya8360

विषय : उन्हाळी बाजरी लागवड, उन्हाळी बाजरी बियाणे, उन्हाळी बाजरी पीक, उन्हाळी बाजरी विषयी माहिती, उन्हाळी बाजरी वाण, उन्हाळी बाजरी कालावधी, उन्हाळी बाजरी उत्पादन, 


अधिक वाचा :

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी

* पौष्टिक
तृणधान्य वर्ष 2023
International Year of Millets

* मौजे ताडपांगरी
येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे

error: Content is protected !!