हळद आणि आले पिकातील किड नियंत्रण, Turmeric and Ginger Crop Pest Management

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

हळद आणि आले पिकातील किड नियंत्रण, Turmeric and Ginger Crop Pest Management

सद्यस्थितीमध्ये हळद Turmeric आणि आले Ginger पिकांची लागवड होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालेला आहे हा
कालावधी हळद पिकाची शाखीय वाढ होण्याच्या (म्हणजेच
45 ते 60
दिवस ) असतो. हळदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण
पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्चित होत असते. सध्या पावसाळी
वातावरणात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची भरपूर वाढ होते. सध्या वातावरणात
जास्त आद्रता ढगाळ वातावरण मध्येच पाऊस अशी स्थिती आहे. बदलत्या तापमानामुळे हळद
पिकावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. परिणामी गड्ड्यांची
संख्या आणि आकारावर अनिष्ट परिणाम होतो दर्जेदार हळद उत्पादनासाठी कीड रोगांची
वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.

 

हळद आणि आले पिकातील किड नियंत्रण Turmeric and Ginger Crop
Pest Management

 

1) कंदमाशी

 

प्रादुर्भावाची
अवस्था
: अळी

 

ओळख :

कंद माशी ही डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची
असते. पाय हे शरीरापेक्षा लांब असतात.

कंदमाशीचे दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखाडी
रंगाचे दोन ठिपके असतात.

 

अनुकूल
घटक :

लांबलेला
पावसाळा कंदमाशीसाठी अधिक अनुकूल असतो.

 

लक्षणे:

कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ किंवा उघड्या पडलेल्या कंदावर
अंडी घालते. साधारण पाच ते सात दिवसांत अंड्यातून लालसर रंगाच्या अळ्या बाहेर
पडतात.

ही अळी उपजीविकेसाठी कंदामध्ये शिरते. अळ्यांचा कंद मध्ये
शिरकाव झाल्यामुळे तेथील रोगकारक बुरशी तसेच सूत्र कृमींचा प्रादुर्भाव होतो आणि
परिणामी कंद मऊ होतात आणि कंदास पाणी सुटून कुजू लागतात.

 

फवारणी

 

क्वीनोलफॉस 25% प्रवाही हे औषध दोन मिली
प्रति लिटर पाणी किंवा डायमेथोएट
30% प्रवाही एक मिली
प्रतिलिटर पाणी याप्रमाणे पंधरा दिवसाच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.


2) खोडकिडा

 

प्रादुर्भावाची
अवस्था
:अळी

 

ओळख
:

किडीचा पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असतो या
किडींच्या दोन्ही पंखावर काळया रंगाचे ठिपके असतात.

 

लक्षणे:

खोडकिडीची प्रोढ मादी पतंग हळदीच्या कोवळ्या पानावर अंडी
घालते. अंड्यातून अळी बाहेर पडल्यानंतर प्रथमतः पानांच्या कडेचे हरितद्रव्य फस्त
करते.

अळी लालसर रंगाची असून शरीरावर काळी टिपके असतात.

अळी खोड व कंद पोखरते तसेच खोडाला छिद्र करून आत शिरून आतीलभाग खाते.

खोडावर पडलेली छिद्र एक खोडमध्ये  अळी
जिवंत असल्याचे लक्षण आहे.

प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या मध्यभागातील पान पिवळी पडलेले
दिसते आणि कालांतराने खोड वाढायला सुरुवात होते.

 

नियंत्रण:

 

प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

प्रकाश सापळे एकरी एक याप्रमाणे वापर करावा.

 

फवारणी

 

निंबोळी तेल 5 मिली प्रति लिटर पाणी
याप्रमाणे किंवा क्वीनोलफॉस
25% प्रवाही दोन मिली प्रति लिटर
पाणी याप्रमाणे आवश्यकतेनुसार गरजेनुसार पंधरा दिवसांनी फवारणी करावी.3) पाने गुंडाळणारी अळी

 

प्रादुर्भावाची
अवस्था
: अळी

 

प्रादुर्भाव
कालावधी
: ऑगस्टचा
शेवटचा आठवडा ते नोव्हेंबर चा दुसरा आठवडा.

 

ओळख

 

प्रौढ पतंग मध्यम आकाराचा असून पंख काळसर तपकिरी रंगाचेअसतात आणि पंखांवर पांढऱ्या रंगाच्या मोठा टिपका असतो.

पूर्ण वाढलेली आणि 2.5-3.7 सेंटीमीटर लांब व हिरव्या रंगाची
असते.

 

लक्षणे

 

अळी पाने गुंडाळून त्यातच लपते आणि  पानांच्या
आत राहूनच पाने फस्त करत असते.

पूर्ण वाढत झालेली अळी पानाच्या गुंडाळीतच कोषावस्थेत जाते.

 

नियंत्रण

 

प्रादुर्भाव दिसताच पानावरील अळ्या व कोष वेचून नष्ट
करावेत.

अळीने उंडाळलेली पाणी खुडून गोळा करून अळीसह नष्ट करावीत.

क्वीनोलफॉस 25% प्रवाही दोन मिली प्रति लिटर
पाणी याप्रमाणे आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

Mahadbt Parbhani Lottery List 19 August 2022 | महाडीबीटी परभणी जिल्हा लॉटरी यादी पहा, डाउनलोड करा

हळद कीड व्यवस्थापन, हळद कीड नियंत्रण, turmeric crop pest management,

error: Content is protected !!