परभणी जिह्यात रुजतोय “स्मार्ट कॉटन” | The Smart Cotton Project Parbhani

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

परभणी जिह्यात रुजतोय "स्मार्ट कॉटन" | The Smart Cotton Project Parbhani

स्व. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन
(स्मार्ट) प्रकल्पांतर्गत 
परभणी जिह्यात
रुजतोय “स्मार्ट कॉटन”


लहान व सीमांत शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या
सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक
मुल्यसाखळी
विकासासाठी मदत देण्याकरिता उभारण्यात आलेल्या स्मार्ट कॉटन(Smart Cotton) प्रकल्प पहिल्याच वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुजला
आहे. या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील
4 तालुक्यामध्ये एकजिनसी कापसाची लागवड करण्यात अली असून
त्या मध्ये शेतकऱ्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. हा प्रकल्प
2021 ते 2026-27 अश्या सात वर्षा करिता राबविला जात आहे.


The Smart Cotton Project Parbhani
परभणी जिल्ह्यातील
20 गावानी स्मार्ट कॉटन प्रकल्पात सहभाग नोंदवुन एक जिनसी
कापसाची लागवड केलेली आहे.
जिंनिंग प्रेसिंगची सुविधा असलेल्या परिसरातील (15 किमी परीघ) शेतकऱ्यांची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. महेश कॉटस्पिन
गंगाखेड व नितीन जिनिंग फॅक्टरी या दोन प्लांट च्या परीसरात हा प्रकल्प राबिला जात
आहे. एका गावाचा एक अशा
20 गावाच्या 20
शेतकरी गटांचा या मध्ये सहभाग असून त्यांनी
2021-22 खरीप हंगामत एकजिनसी कापसाची निवड केलेली आहे. हा प्रकल्प  कॉटन फेडरेशन व कृषि विभाग (Krishi Vibhag) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. या प्रकल्पात
सहभागी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकजिनसी कापसाची थेट विक्री न करता त्याचे
रुई
गाठित रुपांरीत केले जाणार आहे. तर या गाठी ऑनलाईन
पद्धतीने विक्री केला जाणार असून
, त्यापासून मिळणारा पैसा शेतकरी
उत्पादना नुसार शेतकरी खात्यात वितरित केला जाणार आहे. त्यामुळे कापूस विक्रीत
हिस्सा पडणारे व्यापारी
,दलाल,मध्यस्त आदी घटका पासून सुटका होणार आहे.


The Smart Cotton Project Parbhaniकसा आहे प्रकल्प?

कापूस उत्पादन करणाऱ्या प्रमुख जिह्यातील ठराविक उत्पादन
समूहाची स्मार्ट कॉटन प्रकल्पासाठी निवड केली जाते
, अल्प व अत्यल्प
भूधारक शेतकरी
,महिला,अनुजाती जमाती शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व देण्यात येत
आहे.त्यासाठी शेतकरी कार्यशाळेच्या माध्यमातून एकजिनसी कापसाची निवड करण्याकरिता
प्रोत्साहित केले जाते.
स्मार्ट कॉटन (Smart Cotton) ब्रँडच्या विश्वासार्हतेसाठी
उत्पादनापासून गाठी तयार होईपर्यंत पारदर्शकतेसाठी आवश्यक डिजिटल पद्धती विकसित केलेली आहे या साठी प्लांट निहाय तपासन्या
मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून करण्यात येतात.शेतकर्‍यांना व्यापारी होण्याची
संधी

कापसावर प्रक्रिया होऊन थेट सरकीची प्रथम व नंतर रुईगठीची
थेट ऑनलाईन पद्धतीने विक्री होत असल्याने स्मार्ट कॉटन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी
व्यवहार्यता तसेच व्यापारी होण्याची संधी घेऊन आलेला आहे.
पुढील हंगामासाठी
या मध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वागत आहे.
जिंनिंग प्रेसिंगची
सोय असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना या मध्ये सहभागी होता येईल.सहभागी होणाऱ्या
शेतकरी
,शेतकरी गटांना एकजिनसी एकाच वाणाची निवड करण्याचा अधिकार
आहे.

अशी माहिती स्मार्ट कॉटन प्रकल्प जिल्हा नोडल अधिकारी श्री. बी. एस. कच्छवे सर यांनी दिली.

 

अधिक वाचा :


* गंगाखेड
तालुक्यातील कौडगाव येथे स्मार्ट कॉटन प्रशिक्षण संपन्न


* दुसलगाव
येथे स्मार्ट कॉटन प्रशिक्षण वर्ग आयोजित


* पिंपरी
येथे स्मार्ट कॉटन प्रशिक्षण वर्ग संपन्न


* गंगाखेड
तालुक्यातील खंडाळी येथे स्मार्ट कॉटन प्रशिक्षण वर्ग संपन्न


* मौजे
दुसलगाव येथे स्मार्ट कॉटन शेतीशाळा वर्गाचे आयोजन

error: Content is protected !!