विचारमंथन – दिवसेंदिवस घटत जाणारी पक्ष्याची संख्या….| The number of birds is decreasing day by day in country | श्री. एन. के. पगार, मंडळ कृषि अधिकारी, कृषि विभाग, महाराष्ट्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

आज दुपारी द्राक्षाच्या बागात गेलेलोसध्या द्राक्षाचा बागा चालु झालेल्या
काही होणार आहेत. तो बागही चालु होणार होता
 10-15 दिवसा मध्येबागेच्या कडेलाच एक आजीबाई बसली होती  आणि वय
साधारणतः
 
65-70 वर्षांच्या आसपास असेन कदाचित पण आजीबाई एकदम स्वस्थ होती. ती
द्राक्षाच्या बागावर बसलेल्या पक्ष्यांना हुसकावून लावण्याच काम करत होती हातामधे
एक स्टीलचा डबा आणि त्यावर मारा करण्यासाठी एक काठी अगदी दिमाखात.
 
आजूबाजूला नजर टाकली तर बघितले तिथे
खूप सारे पक्षी होते म्हणजे चिमणी
साळुंकीपारवातितर आणि अगदी मोर सुद्धा होते
आजूबाजूला. या कडेला पक्षी हुसकावले की दुसर्‍या बाजुला जाउन बसत जणु काय त्याचा
लपंडाव चालु होता
व तो पक्ष्याचा किलबिलाट पाहुन मनही सुखावले.

     आजचा विषयच असा गंभीर आहे कि दिवसेंदिवस घटत जाणारी पक्ष्याची संख्या. आपल्यापैकी
बरेच लोक शहरातील असतील आणि बरेच लोक गावातील पण
वरील उल्लेख केल्याप्रमाणे मला आज खूप
सारे पक्षी दिसले बागेत त्याचा किलबिल आवाज ऐकला व छान वाटले पण
 शहरातील किती लोकांनी या सर्व पक्षांना पाहिल किंवा
किती दिवस झाले त्यांना पाहून आठवले
शेतासारखे सर्व ठिकाणी आढळणारे पक्षी आज
शहरातून नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे. केला का आपण कधी विचार या
गोष्टीचा
आज तर शहरातील ज्या अंत्यविधी असता ना त्यासाठी कावळे सुद्धा लवकर जमा होत
नाही ही खरी परिस्थिती. काही दिवसाने ते कावळे पिंजर्‍यात बंद करून ते विधी
उरकण्यासाठी त्याचा पण व्यवसाय सुरू नाही झाला तर नशीब!

     विषय तसा गमतीचा नाही पण आपल्या माहितीसाठी विशेष म्हणजे
जगामधे
 8600 पक्ष्याच्या जाती अस्तित्वात होत्या त्यापैकी 268 जाती आतापर्यंत नामशेष झाल्या तर बरेच दुर्मिळ जाती नामशेष होण्याच्या
मार्गावर आहेत. आपल्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर सर्वात दुर्मिळ होत चाललेला
पक्षी चिमणी म्हणजेच आपली सर्वाची चिऊताई. कधी काळी चिऊताई आणि कावळे पाहून जी गोष्ट
सांगितली जायची ती कदाचित चित्रच राहून जातील.

     विशेष म्हणजे गोष्ट ही फक्त पक्ष्याच्या घटनर्‍या संख्येबद्दल नाही तर बदलणार्‍या
निसर्ग चक्राची पण आहे. पक्षांची संख्या कमी झाल्या कारणाने शेतात असणार्‍या
पिकांचे कीड खुप सार्‍या प्रमाणात वाढत असुन परिणामी कीड नाशके ईतक्या मोठ्या
प्रमाणात वाढले की त्यामुळे सर्वाच प्राण्याची रोगप्रतिकारक शक्ति कमी झाल्यात
विशेष म्हणजे माणूस पण यामधून काही सुटलेला नाही. एकूणच निसर्गाच चक्रच बिघडत
चालले आहेत… पटल तर नक्की विचार करा.

     पक्षाची संख्या का घटत जाण्याचे कारणे काय मग? सुरुवात झाली ती
औद्योगिक प्रगती पासून भरमसाठ वाढत गेलेल्या कंपनी
त्यामधून पडणारे विषारी वायूधूरजंगलतोडरस्तेवाहनाची वाढत जाणारी संख्या असे असंख्य कारणे आहेत हे आपल्याला माहितीच आहे.
अलीकडील आलेल्या फॉरेस्ट सर्वे मध्ये हा पण खुलासा झाला की चिमण्यांची संख्या कमी
होण्यामागे मोबाइल फोनच सिग्नल किरणे हे आहेत.
  तेव्हा पक्षी
आणि त्याच उध्वस्त होणार आयुष्य आपल्या सर्वासमोर आहेच
प्रयत्न फक्त असा असावा की आपल्यामुळे कोणा पक्षांना हानि पोहोचणार नाही.

विचारमंथन – मराठी लेख

लेखण: 

श्री. एन. के. पगार

मंडळ कृषि अधिकारी

कृषि विभाग, महाराष्ट्रमूळ लेख WWW.360AGRI.IN वेबसाइट वरील आहे

error: Content is protected !!