सोयाबीन पाने पिवळे पडत आहेत? तर अशा प्रकारे करा व्यवस्थापन | Soybean Chlorosis Yellowing of Leaves, Soybean Spraying Micronutrients

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

सोयाबीन पाने पिवळे पडत आहेत? तर अशा प्रकारे करा व्यवस्थापन | Soybean Chlorosis Yellowing of Leaves, Soybean Spraying Micronutrients

सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस) Soybean Chlorosis कारणे व व्यवस्थापन

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे
सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस”
Soybean Chlorosis
लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस
Soybean Chlorosis ही एक शारीरिक विकृती आहे.        

लक्षणे:

·        
लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम
कोवळ्या पानांवर दिसून येते.

·        
हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा
पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात.

·        
सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे
अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. 

·        
लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीनपानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात.

·        
पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश
संश्र्लेषण क्रिया मंदावते
, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

 

कारणे:

लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या
चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार
करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा
जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तथापि
, बर्‍याचदा
जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध
स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही.
त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते.

व्यवस्थापन:

·        
शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले
असेल ते काढण्याची सोय करावी.

·        
०.५ टक्के(५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) फेरस सल्फेट (Ferrous Sulphate) ची पानांवर फवारणी करावी किंवा (EDTA Chelated Mix) ईडीटीए चिलेटेड
मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (
II) ५० ग्रॅम प्रती १०
लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ अवश्य पहा

 

सोयाबीन पिवळे पडत आहेत,सोयाबीन पिवळे
पडणे उपाय
,सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे,सोयाबीन पिवळे पडणे,सोयाबीन पिवळी पडणे,soybean chlorosis,soybean yellow leaves,
Soybean Chlorosis Yellowing of Leaves, Soybean Spraying Micronutrients, EDTA Chelated Mix, Ferrous Sulphate, फेरस
सल्फेट
, ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२, वाफसा स्थिती

error: Content is protected !!