sharad pawar gram samridhi yojana 2023 | शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाची अपडेट | गाय म्हैस गोठा अनुदान महाराष्ट्र 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

sharad pawar gram samridhi yojana 2023 | शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाची अपडेट | गाय म्हैस गोठा अनुदान महाराष्ट्र 2023

शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाची अपडेट


शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 : महाराष्ट्र शासनाने शरद पवार
यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त ही योजना सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाची
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि
ग्रामीण भागातील सर्वांची आर्थिक परीस्थिती सुधारणे हे आहे. योजनेचा उद्देश असा आहे
की ग्रामीण भागात राहणार्‍या मजुरांना त्यांच्याच कार्य क्षेत्रात रोजगार मिळावा.

 

1.  
गायी म्हसी यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे

2.  शेळीपालन शेड बांधणे

3.  कुकुट पालन शेड बांधणे

इत्यादि घटक/बाब करिता अनुदान देण्यात येते.

 

शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023 महत्वाची
अपडेट

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याजेने अंतर्गत
काही योजनांच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना राबविण्यास शासन
मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयात गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधण्या
बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे
टॅगिंग आवश्‍यक राहील
, असे नमूद करण्यात आले आहे. बँक ऋण घेऊन किंवा पशुसंवर्धन वा अन्य
विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या गाय
, म्हैस यांना टॅगिंग करण्यता
येते. तथापि
, स्वखर्चाने घेतलेल्या जनावरांना टॅगिंग
नसल्याने गोठे देण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतात व लाभार्थी पात्र असूनदेखील या
योजनेतील लाभापासून वंचित राहतात.


नक्की वाचा : शरद
पवार ग्राम समृद्धि योजना 2023 अर्ज प्रक्रिया


सदर बाबीसंदर्भात सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.
त्यानुसार उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयामधील अ.क्र.१ मधील अनुज्ञेयता मुद्यातील
दुसर्‍या परिच्छेदातील


“गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्‍यक
राहील.” या ऐवजी


“संबंधित ग्रामसेवक/तांत्रिक सहाय्यक/ग्रामरोजगार सेवक
यांनी पंचनामा करुन लाभार्थ्यांकडे उपलब्ध जनावरांची आकडेवारी प्रमाणित करावी.
पंचनामा करतांना ग्रामसेवक
,
जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकां पैकी एक किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्या पैकी
कोणीही एक हजर असणे आवश्‍यक राहील. ” असे वाचण्यात यावे.

 

वरील प्रमाणे शासन निर्णय मधील मसुदा आहे.

 

तर, शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत यापूर्वी लाभ घेण्यासाठी
जो प्रस्ताव सादर करावा लागतो त्या सोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक होते आणि त्यामुळे
काही लाभार्थी हे जनावरांचे टॅगिंग नसल्यामुळे योजनेत सहभागी होऊ शकत नव्हते परंतु
आता या शासन निर्णयामुळे लाभार्थ्यांकडे उपलब्ध जनावरांची आकडेवारी ही ग्रामसेवक /
तांत्रिक सहाय्यक / ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करुन प्रमाणित करतील आणि लाभार्थी
हा या योजनेत सहभागी होऊ शकतो.


शरद पवार ग्राम समृद्धी योजना : 03/02/2021 शासन निर्णय :
पहा

शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 : 17/03/2023 शासन
निर्णय


अधिक वाचा :

* गहू
साठवणूक करताय तर मग हे उपाय करा

* शरद
पवार ग्राम समृद्धि योजना 2023 अर्ज प्रक्रिया

* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 27 फेब्रुवारी 2023 पहा

* नवीन तुषार /
ठिबक संच निवड यादी आली..येथे पहा

* कृषि यंत्रे
सोडत 15 फेब्रुवारी 2023


error: Content is protected !!