रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका बक्षिसे रु. 5000, 10,000 आणि 50,000 | अर्जाचा नमूना, सादर करण्याचा अंतिम दिनांक? | pik spardha krushi vibhag

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध
भागांमध्ये
शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व
उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील 
शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची
इच्छाशक्ती
, मनोबल
यांमध्ये वाढ होऊन आणखी
उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी
शेतक-यांचे योगदान मिळते. तसेच
त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण
उत्पादनात मोलाची
भर पडते
,
हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात
येत आहे. pik spardha

 

सद्यस्थितीत या योजनेमध्ये पिकस्पर्धेतील पिकांमध्ये अवाजवी
उत्पादकता येणे
, पिकस्पर्धा
निकाल
घोषित करणेकामी खुप अवधी लागणे, स्पर्धक शेतकरी पिक कापणीचे वेळी सर्व ठिकाणी अधिकारी हजर राहणे शाक्य न होणे
तसेच राज्यस्तरीय बक्षीस एकाच वर्षाच्या उत्पादकतेवर अवलंबून असल्याने संबंधित
स्पर्धकांच्या उत्पादकतेमध्ये
सातत्य आहे किंवा कसे हे न समजणे
, अशा अनेक कारणास्तव पिकस्पर्धेमध्ये बदल करण्याबाबतची
मागणी क्षेत्रिय स्तरावरुन होत आहे. यास्तव पीकस्पर्धेमध्ये अधिक पारदर्शकता
आणणे, दुय्यम व पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि
उत्पादनात वाढ होण्यासाठी
, पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी आवश्‍यक प्रचार व प्रसिद्धी
करणे आवश्‍यक आहे. या उद्देशाने पिक
स्पर्धेच्या यापुर्वीच्या कार्यपध्दतीमध्ये बदल करण्याची
बाब शासनाच्या विचाराधीन होती. 
pik spardha 


पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याकरिता
कृषि आयुक्तालयाने या संदर्भाधीन
पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावावर साकल्याने विचार करून
समित्यांचे पुनर्गठन
, पात्रतेचे निकष, विविध प्रपत्रे, पिकस्पर्धा विजेते संख्या, स्वरुप, बक्षिस रक्‍कमेमध्ये वाढ करणे, पिकस्पर्धांकरीता वेळापत्रक विहित करणे तसेच विविध
स्तरावरील पिकस्पर्धेसाठी विहीत करण्यात आलेल्या निकषामध्ये कालानुरूप बदल
करण्याची आवश्‍यकता
लक्षात घेवून पिकस्पर्धेबाबत यापुर्वीचा दि.०५ ऑक्टोबर
,२०२० चा शासन निर्णय या निर्णयाद्वारे
अधिक्रमीत करून सन २०२२-२३ च्या पिकस्पर्धेच्या निकषामध्ये बदल करणेसंबधीची बाब
शासनाच्या
विचाराधीन होती.

 

वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या
क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ
होण्याची आवश्‍यकता विचारात घेऊन
तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिकस्पर्धेमध्ये सहभागी होतील या
दृष्टीकोनातून पिक
स्पर्धांच्या निकषांबाबतचा संदर्भाधीन दि.०५ ऑक्टोबर
,२०२० रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून
पिकस्पर्धाच्या निकषांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन सदर झासन
निर्णयान्वये
मान्यता देत आहे. 
pik spardha

 

१. पीकस्पर्धेतील पिके : हंगाम निहाय पिके

* खरीप
पीके
: भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर,
मूग, उडीद,
सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल (एकूण ११ पिके)

 

* रब्बी
पीके
: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस (एकूण ०५ पिके)

 

पीकस्पर्धेतील पिकांची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील
एकूण लागवड क्षेत्र किमान १०००

हेक्‍टर असावे. तथापि संबंधित पिकाखालील क्षेत्र १००० हेक्‍टर
पेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये

सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण)
यांची विहीत मार्गाने लेखी

परवानगी घेणे बंधनकारक आहे.

 

२. स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या, –

 

पीकस्पर्धेसाठी तालुकास्तरासाठी तालुका, जिल्हास्तरासाठी जिल्हा व राज्यस्तरासाठी राज्यातील सर्व
जिल्हे हे घटक आधारभूत धरण्यात येईल.

 

किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी
गटासाठी ५ (यापेक्षा कमी स्पर्धक
संख्या असल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी/जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी यांनी
संबंधित पिकाची त्या वर्षाकरीताची पिकस्पर्धा रद्द करावी.)

 

पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर
त्यापीकाखाली भात पिकासाठी किमान २०
आर व इतर पिकासाठी ४० आर क्षेत्रार सलग लागवड असणे आवश्यक
आहे.

 

तालुकास्तरीय स्पर्धा तालुका कृषि अधिकारी यांनी, जिल्हास्तरीय स्पर्धा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी व
राज्यस्तरीय स्पर्धा मा. संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी जाहीर करावी.

 

पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या – सर्वसाधारण
गटासाठी०५ व आदिवासी
गटासाठी ०४ स्पर्धकांची पीक कापणी होणे आवश्‍यक आहे.
(यापेक्षा कमी स्पर्धकांची पिक
कापणी झाल्यास संबंधित पिकस्पर्धा जाहीर करणाऱ्या
अधिकाऱ्यांनी संबंधित पिकाची त्या
वर्षाकरीताची पिकस्पर्धा रद्द करावी.)

 

३.पीक कापणी प्रयोगासाठी प्लॉटची मोजमापे –

 

पिकस्पर्धेतील पिकांच्या कापणीसाठी प्लॉटची निवड ही
सांख्यिकी विभागाच्या मार्गदर्शक
सूचनांनुसार करण्यात यावी.

पिकस्पर्धा प्लॉटची कापणी व मळणी एकाच दिवशी करण्यात यावी.

 


 

 

५. स्पर्धेमध्ये भाग घेणारे शेतकरी:

 

कोणत्याही पातळीवरील स्पर्धेत भाग घेताना शेतकऱ्याकडे
त्याच्या स्वताचे नावावर जमीन असली
पाहिजे व ती जमीन तो स्वतः कसत असला पाहिजे.

तालुका पातळीवरील पीकस्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतक-यांना
भाग घेता येईल.

जिल्हा पातळीवरील स्पर्धेत पूर्वी कधीही तालुका स्तरावरील
स्पर्धेत प्रथम तीन आलेले शेतकरी पात्र
राहतील.

राज्य पातळीवरील स्पर्धेत यापूर्वी कधीही जिल्हा स्तरावरील
स्पर्धेत प्रथम तीन आलेले शेतकरी पात्र
राहतील.

स्पर्धेत भाग घेणा-या शेतकऱयाला एकाच वेळी एकापेक्षा जास्त
पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता
येईल.

 

६. स्पधेसाठी प्रवेश शुल्क:

 

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रक्‍कम
रु.३०० राहील.

पीक स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकाने स्पर्धेतून माघार
घ्यावयाची झाल्यास कापणीपूर्वी किमान १५
दिवस अगोदर माघार घेतल्याचे सर्व
संबंधित अधिकाऱ्यास लेखी कळवावे. तसेच माघार कोणत्या
कारणासाठी घेतली हे
अर्जात सुस्पष्ट नमुद करावे.

 

७. अर्ज दाखल करण्याची तारीख:-

निरनिराळया हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची
तारीख खालील प्रमाणे राहिल.

खरीप हंगाम-

* मूग व उडीद पिक: ३१ जुलै

* भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी(रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल: – ३१ ऑगस्ट

 

रब्बी हंगाम-

ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस:- ३१ डिसेंबर

 

.
पीकस्पर्धेचा निकाल

 

ज्या शेतक-यांची पिकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या
सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा दुप्पट किंवा
त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतक-यांना
पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येऊन
त्यांच्यामधून
तालुकास्तरीय प्रथम
, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील. त्यापेक्षा कमी उत्पादन असणारे
शेतकरी पीकस्पर्धा पुरस्कारासाठी अपात्र समजण्यात येतील.

 

ज्या पीकाच्या उत्पादकतेची तालुकास्तरावर अधिकृत माहिती
उपलब्ध नसेल
अशा ठिकाणी राज्याच्या उत्पादकतेपेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक
आहे अशा शेतक-यांना पिकस्पर्धेतील
पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येऊन त्यांच्यामधून
तालुकास्तरीय प्रथम
, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील. त्यापेक्षा कमी उत्पादन असणारे शेतकरी
पिकस्पर्धा पुरस्कारासाठी अपात्र
समजण्यात येतील.

 

पीकस्पर्धेत तालुक्यामधील सहभागी झालेल्या स्पर्धकांची पीक
कापणी झाल्यानंतर
, पिकनिहाय उत्पादकतेच्या गुणानुक्रमे पहिल्या तीन शेतक-यांची माहिती
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
यांचेकडे सादर करण्यात यावी, पिकनिहाय उत्पादकतेच्या गुणानुक्रमे पहिले तीन शेतकरी जिल्हास्तरावरील
स्पर्धेसाठी पात्र असतील.

 

जिल्हास्तरावरील पीकस्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची
पीक कापणी झाल्यानंतर पिकनिहाय
उत्पादकतेच्या गुणानुक्रमे पहिल्या तीन शेतक-यांची
माहिती विभागीय कृषि सहसंचालक यांचेकडे
सादर करण्यात यावी, पिकनिहाय
उत्पादकतेच्या गुणानुक्रमे पहिले तीन शेतकरी राज्यस्तरीय
स्पर्धेसाठी पात्र
असतील.

 

तालुकास्तर,जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते
निवडण्यात येतील.

 

.
पिकस्पर्धा विजेते – बक्षीसांचे स्वरूप

 

जिल्हा व तालुका पातळीवरील बक्षिसे संबंधित पातळीवर विशेष
कार्यक्रमाचे आयोजन करुन
सन्मानपूर्वक देण्यात यावीत.

राज्यपातळीवरील पिकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे, कृषि पुरस्कार सत्कार समारंभात देण्यात
येतील.

 

बक्षिसांचे स्वरुप :रब्बी हंगाम 2022-23
साठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 31/12/2022


सादर करावयाच्या अर्जाचा नमूना : अर्ज डाउनलोड करा


अर्ज सादर करावयाचे ठिकाण : तालुका कृषि अधिकारी कार्यालय


पीक स्पर्धा शासन निर्णय पहा : शासन निर्णय डाउनलोड करा


पीक स्पर्धा इतर प्रपत्र : पहा/डाउनलोड कराअधिक वाचा :

* महाडीबीटी
नवीन पूर्व संमती यादी पहा?

* कुसुम सोलर पंप
साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड
अर्ज करण्यास सुरुवात झाली…

error: Content is protected !!