पूर्व संमती यादी महाडीबीटी फार्मर पोर्टल 25/09/2022 | MahDBT Farmer Portal Pre sanction List , MahaDBTFarmer,MahaDBTFarmerScheme

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

पूर्व संमती यादी महाडीबीटी फार्मर पोर्टल 25/09/2022 | MahDBT Farmer Portal Pre sanction List , MahaDBTFarmer,MahaDBTFarmerScheme

नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाडीबीटी पोर्टल द्वारे (Mahadbt
portal) महाडिबीटी शेतकरी योजना अंतर्गत विविध योजनांसाठी महाडीबीटी
पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण
,
कृषी सिंचन साधने व सुविधा
, फलोत्पादन,
बियाणे इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर (
Mahadbtfarmer)अर्ज मागविले जातात.

 

कृषी यांत्रिकीकरण घटका अंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर, रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र,
पलटी नांगर
, कडबा कुटी, ऊस पाचट कुटी
यंत्र
, ऊस खोडवा कटर, बैलचलित पेरणी
यंत्र
, फवारणी यंत्र इत्यादी घटकांसाठी पोर्टलवर (Mahadbtfarmer)अर्ज करू शकतात.

 

कृषी सिंचन साधने व सुविधा अंतर्गत शेतकरी तुषार संच, पीव्हीसी
पाईप
, इलेक्ट्रिक मोटर सिंचन पंप, ठिबक
सिंचन इत्यादी घटकांसाठी पोर्टलवर अर्ज करू शकता
.

 

बियाणे घटकांतर्गत शेतकरी सोयाबीन, ज्वारी, मका, हरभरा, तुर हे बियाणे
अनुदानावरती मिळविण्यासाठी पोर्टलवर
(Mahadbt portal) अर्ज
करू शकता
.

 

फलोत्पादन घटकांतर्गत शेतकरी फळबाग लागवड, शेडनेट, पॉलिहाऊस, इत्यादी घटकांसाठी अर्ज सादर करू शकतात.

 

महाडीबीटी पोर्टलवर (Mahadbtfarmer) अर्ज केल्यानंतर
दर दहा ते पंधरा दिवसांनी प्राप्त झालेल्या अर्जांमधून सोडत जाहीर केले जाते आणि
या सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना निवड झालेल्या घटकासाठी आवश्यक
कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात
,

 

निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला दहा दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या घटकासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की सातबारा होल्डिंग
निवड झालेल्या घटकाचे कोटेशन टेस्ट रिपोर्ट ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी आरसी बुक
इत्यादी कागदपत्रे अपलोड करावे लागतात. जे शेतकरी दहा दिवसांमध्ये कागदपत्रे अपलोड
करण्यास असमर्थ ठरतील त्यांचा अर्ज पोर्टल
(Mahadbtportal) द्वारे रद्द
करण्यात येऊन प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते
.

 

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पोर्टल द्वारे कागदपत्रांची
ऑनलाइन पद्धतीने छाननी केल्या जाते आणि त्यानंतर लाभार्थ्याला निवड झालेला घटक
खरेदी करण्याची मुभा दिली जाते म्हणजेच पूर्वसंमती (
Pre sanction List) दिली जाते.

 

पूर्वसंमती (Pre sanction List) मिळाल्यानंतर लाभार्थ्याला निवड झालेला घटक खरेदी करून पोर्टलवर बिल अपलोड करण्यासाठी 30
दिवसांची मुदत दिली जाते आणि या 30 दिवसांमध्ये
जर लाभार्थी बिल अपलोड करण्यास असमर्थ ठरला तर त्याची पूर्वसंमती रद्द करण्यात
येऊन प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते
.

 

दिनांक 19 जुलै 2022 रोजीच्या
कृषी आयुक्त यांच्या महाडीबीटी पोर्टल (
Mahadbtportal)मार्गदर्शक
सूचना प्रमाणे लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टलवर ज्या कृषी यंत्राचे कोटेशन आणि
टेस्ट रिपोर्ट अपलोड केला आहे त्यानुसारच पूर्ण संमती देण्यात यावी असे निर्देश
आहेत आणि लाभार्थ्याला अपलोड केलेल्या कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट प्रमाणेच निवड
झालेला घटक खरेदी करावा लागेल आणि जर लाभार्थ्याला अपलोड केलेल्या कागदपत्रांना
बाब बदल करावयाची असेल तर त्या लाभार्थ्याला उपविभागीय कृषी अधिकारी यांची संमती (
Pre
sanction List) घेणे आवश्यक आहे.

 

महाडीबीटी पोर्टल वरील दिनांक 25 सप्टेंबर 2022
अखेर पूर्वसंमती यादी पाहण्यासाठी खालील पर्यायी वरती क्लिक करावे.

 

परभणी जिल्हा : Download

 इतर जिल्हे : पहा/डाउनलोड करा


नवीन अपडेट साठी महाडीबिटी फार्मर अँड्रॉइड ॲपलिकेशन इंस्टॉल करा

Mahadbtfarmer, Mahadbtfarmerschemes, Mahadbtportal, Pre
sanction List

error: Content is protected !!