MahaDBT Farm Pond : महाडीबीटी वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | या पद्धतीने अर्ज केला तर लॉटरी मध्ये निवड होणारच…Online Application Process

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


महाराष्ट्र राज्यात पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर
आधारीत जलसंधारणाच्या MahaDBT Farm Pond उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी देखील
शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविलेली आहे. आणि त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व
उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे.

 


शेतक-यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे MahaDBT Farm Pond चे खोदकामासाठी
येणारा खर्च करणे शक्‍य होत नाही. सद्यस्थितीत राज्यातील शेतक-यांना शेततळे
खोदकामासाठी शासनाची कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री
शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश
केलेला आहे. आणि आता महाराष्ट्र राज्यातील सर्व इछुक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता
येईल.

 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची पद्धती ही खालील प्रमाणे
आहे
, आपण खालील दिलेल्या पद्धतीने अर्ज केला तरच आपली शेततळे MahaDBT Farm Pond साठी निवड होईल त्यामुळे
पद्धत व्यवस्थित पहावी आणि अर्ज करावा.

 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती

 



स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन
करावे (
mahadbt login)

 

स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा

 



स्टेप 3: सिंचन साधने आणि सुविधा ही बाब
निवडावी

 



स्टेप 4: आपला तालुका, गाव, गट क्रमांक निवडावा 



स्टेप 5: अनुदान हवे असलेली बाब
निवडावी

वैयक्तिक शेततळे हे निवडावे

 



स्टेप 6: उपघटक निवडावा

इनलेट आणि आउटलेट सह किंवा इनलेट आणि आउटलेटशिवाय हे निवडावे

 



स्टेप 7: शेततळ्याचे आकारमान निवडावे

 



स्टेप 8: शेततळ्याचा स्लोप निवडावा

 




स्टेप 9: अर्ज जतन करावा

 


स्टेप 10: मुख्य पृष्ठ वरती यावे

 


स्टेप 11: अर्ज सादर करा हा पर्याय
निवडावा

 


स्टेप 12: प्राधान्यक्रम देऊन अर्ज
सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा

 


वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर वैयक्तिक शेततळे ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. 

 

अर्ज सादर केल्यानंतर सोडत साठी अर्ज विचारात
घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याला त्याच्या मोबाईल संदेशवद्वारे सूचित करण्यात येईल.



मुख्यमंत्री
शाश्वत कृपी सिंचन योजना
वैयक्तिक शेततळे : शासन निर्णय

 

मुख्यमंत्री
शाश्वत कृपी सिंचन योजना
वैयक्तिक शेततळे : मार्गदर्शक सूचना 


अधिक वाचा :

* परभणी
जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

* महाडीबीटी
बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का
?

* या”
तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

* पंजाब डख हवामान
अंदाज 04 मे ते 23 मे

error: Content is protected !!