सन २०२२-२३ मध्ये राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सूचना Mahadbt Farm Mechanization scheme new guidelines mahadbtfarmer scheme,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

सन २०२२-२३ मध्ये राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सूचना Mahadbt Farm Mechanization scheme new guidelines mahadbtfarmer scheme,

सन २०२२-२३ मध्ये राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण
कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता मार्गदर्शक
सूचना


सन २०२२-२३ मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण
कार्यक्रमासाठी
२४० कोटी निधीचे कार्यक्रमास दि. २ मे २०२२ रोजीच्या शासन
निर्णयान्वये राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून पहिल्या
टप्प्यात
५६ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. संदर्भ क्र. ४ अन्वये सन २०२१-२२ मध्ये राज्यात
राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण
कार्यक्रमाच्या
अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सुचना निर्गमित आलेल्या असून त्या कृषि
विभागाच्या
संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. सन २०२२-२३ साठी खालीलप्रमाणे करण्यात आलेले बदल वगळता उर्वरित सूचना
मागीलवर्षी प्रमाणेच राहतील.
यावर्षीच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेले महत्वाचे
बदल पुढीलप्रमाणे :कृषी यांत्रिकीकरण
मार्गदर्शक सूचना

महत्वाचे बदल 


Ø
अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्‍टरची किमान ६ वर्ष आणि ट्रॅक्‍टरचलित औजारांची किमान ३
वर्ष विक्री करता येणार नाही
अन्यथा देण्यात आलेली अनुदान रक्‍कम वसुलीपात्र राहील.

 

Ø
एका लाभार्थ्यास ट्रॅक्‍टर सोबत अनुदानावर ट्रॅक्‍टरचलित
औजारे घ्यावयाची झाल्यास जास्तीत जास्त ३ औजारे किंवा रु. १ लाख अनुदान रकमेपर्यंत जेवढी
येतील तेवढी
या दोन्ही पैकी जे कमी असेल त्या मर्यादेत
अनुदान देय राहील.

 

Ø
ज्या औजारासाठी अनुदानाची रक्कम रु. १ लाख पेक्षा जास्त आहे अशा औजारासाठी
एका वर्षात फक्त एकाच औजारासाठी अनुदान अनुज्ञेय राहील
.

 

Ø
ट्रॅक्‍टरचलित औजारांच्या अनुदानासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडे ट्रॅक्‍टर असणे बंधनकारक राहील.
त्यासाठी
       
RC Book ची सत्यप्रत
खात्री करण्यासाठी सादर करणे बंधनकारक
राहील.

 

Ø
लाभार्थीने त्यांस मंजूर झालेल्या यंत्र औजारासाठी
पोर्टलवर अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट प्रमाणेच
यंत्र/औजार खरेदी करणे आवश्यक
राहील. तथापि अपवादात्मक परिस्थितीत त्याच
प्रकारचे यंत्र अवजार शेतकरी दुसऱ्या कंपनीचे खरेदी करू इच्छित असेल तर अशा बदलास उप विभागीय कृषी अधिकारी यांची लेखी संमती
आवश्यक राहील
.

 

Ø
यंत्र/औजारांची खरेदी रोखीने करण्याबाबतची सवलत रदद
करण्यात येत असून यंत्र/औजारांची खरेदी
कॅशलेस पद्धतीनेच करणे बंधनकारक राहील.(RTGS,NEFT,इ.)

 

Ø
महाडीबीटी पोर्टलवरील सोडतीद्वारे निवड झाल्यापासून
१० दिवसात संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड
करणे
आवश्यक आहे आणि पूर्वसंमती मिळाल्यापासून ३० दिवसात यंत्र/औजारांची
खरेदी करून बील अपलोड करणे
आवश्यक आहे
.


अधिक माहिती साठी हा विडियो पहा


महाडीबीटी शेतकरी योजना महत्वाची
अपडेट
, MahaDBT Portal Farmer Scheme,कृषि यांत्रिकीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करिता
मार्गदर्शक
सूचना, कृषि
यांत्रिकीकरण योजनेत झाले बदल
,महाडीबीटी पोर्टल,शेतकरी
योजना
,कृषि यांत्रिकीकरण,farm mechanization,scheme guidelines,mahadbtfarmer,mahadbt yojana,mahadbt lottery list,महाडीबीटी योजना,महाडीबीटी लॉटरी यादी,mahadbt lottery list २०२२,महाडीबीटी लॉटरी यादी
२०२२

error: Content is protected !!