पाथरी येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन | krushi sanjivani mohim pathari, krushi din

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

पाथरी: दि. १ जुलै रोजी   मा. तालुका कृषी अधिकारी पाथरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री. गोविंद कोल्हे तंत्र अधिकारी परभणी श्री लोढे साहेब तंत्र अधिकारी यांनी कृषी विभागाच्या विविध योजना बाबत माहिती दिली . 


तसेच प्रगतशील शेतकरी गजानन घुंबरे , ज्ञानेश्वर घांडगे अध्यक्ष सवोदय शेतकरी उत्पादक कंपनी , सौ . नंदाताई गायकवाड , वैभव खुडे ,  बाबा साहेब रणेर कृषि भुषण शेतकरी या सर्व शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी सुत्रसंचालन विशाल दलाल तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पाथरी यांनी केले व क्रार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन जाधवर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले .उपस्थित श्री. विजय नांदे  मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, शेतकरी मीत्र, व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!