मौजे खादगाव ता. गंगाखेड जि परभणी येथे कृषि संजीवनी मोहीम राबविण्यात आली | krushi sanjivani mohim at Khadgaon, Gangakhed, Parbhani

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


गंगाखेड तालुक्यातील मौजे
खादगाव जिल्हा परभणी येथे
दिनांक 27/06/2022 रोजी कृषी विभाग व आत्मा अंतर्गत कृषी संजीवनी मोहीम  कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात मा.
श्री एन.टी.शिसोदे
, संचालक मृद व  जलसंधारण, कृषी आयुक्तालय, पुणे यांची प्रमुख उपस्थिती
होती.

मा. श्री एन.टी.शिसोदे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना खरीप हंगामाबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच भाजीपाला लागवड व फळबाग लागवड वाढविण्याविषयी आवाहन केले. कार्यक्रमानंतर खादगाव
आदर्श गाव मधील मृद व जलसंधारण कामाची पाहणी केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेश फड, जिल्हा परिषद सदस्य परभणी, कृषी उपसंचालक परभणी श्री बी.एन.कच्छवे सर , श्री.बनसावडे, तालुका कृषी अधिकारी गंगाखेड, कु.पौळ, मंडळ कृषी अधिकारी, गंगाखेड श्री.चव्हाण,  कृषी पर्यवेक्षक, श्री. गायकवाड , कृषी सहाय्यक व आत्माचे श्री रमेश सिरस सहाय्यक तंत्रज्ञान
व्यवस्थापक तसेच गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी 
कार्यक्रमास उपस्थित होते.

error: Content is protected !!