मौजे सोनखेड ता. सोनपेठ येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले | krushi din sonpeth

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

सोनपेठ: आज दि. १ जुलै रोजी मौजे
सोनखेड ता. सोनपेठ येथे मा. तालुका कृषी अधिकारी
, सोनपेठ
यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत कै.वसंतराव नाईक यांच्या
जयंती निमित्त कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


याप्रसंगी शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया,बी.बी.एफ यंत्राचा वापर करून सोयाबीन पेरणी, तणनाशक किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत
प्रात्यक्षिक
दाखविण्यात आले तसेच खतांचा संतुलित वापर, निंबोळी अर्कचा वापर, सापळा पिक लागवड, महाडिबीटी योजना, म ग्रा रो ह यो अंतर्गत फळबाग लागवड बाबत तसेच उत्पादन वाढीसाठी
आवश्यक असलेले तंत्रज्ञानाचा वापराबाबत प्रचार व प्रसार करण्यात आला व कृषी
विभागाच्या विविध योजना बाबत माहिती
देण्यात
आली
यावेळी उपस्थित मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, बी.टी.एम.आत्मा, समूह सहाय्यक, शेतकरी मीत्र, व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!