हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थपान | Gram Pod Borer Management | कृषि सल्ला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थपान | Gram Crop Borer Management | कृषि सल्ला

सद्य
परिस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा
Gram Pod Borer : Helicoverpa
armigera

प्रादुर्भाव
वाढण्याची
शक्यता आहे आणि तसेच अंधार रात्री
असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडे देऊ शकतात
या
सर्व बाबी घाटे
अळीस पोषक असल्यामुळे सध्या
घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होऊ शकतो
बऱ्याच
ठिकाणी या अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली आहे
हि
कीड बहुभक्षी असून विशेषतः पीक फुलोरा आणि प्रामुख्याने
घाटे
अवस्थेत
नुकसानकारक असते
यामध्ये लहान अळया सुरुवातीला कोवळी
पाने
कळया
व फुले कुरतडुन खातात. घाटे लागल्यानंतर अळया घाटे कुरतडुन त्यास छिद्र पाडुन डोके
आत खुपसुन आतील दाणे खातात. साधारणता: एक अळी तीस ते चाळीस घाटयांचे नुकसान करु
शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी अवस्था असल्यामुळे
वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते
. असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठकिटकशास्त्र
विभागाचे प्राध्यापक डॉ. पी.एस. नेहरकर
सरडॉ.
अनंत लाड
सर, डॉ. राजरतन खंदारे सरडॉ.
योगेश मात्रे
सर
यांनी केले आहे.
हरभरा
पिकामध्ये
सद्य परिस्थितीत करावयाच्‍या उपाययोजना :

कोळपणी
किंवा निंदणी करुन पीक तणविरहित ठेवावे तसेच घाटेअळीच्या मोठया अळया हाताने वेचून
त्यांना नष्ट करावे
घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी  कामगंध सापळे जमिनीपासुन १ मिटर उंचीवर लावावेत. कामगंध
सापळयामध्ये ८ ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किटकनाशकाची
फवारणी करावी.
 शेतामध्ये पक्षी
बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० उभारावेत
यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे
 भक्षण करणे सोपे जाईल. 


महाडीबीटी लॉटरी याद्या


पिकाच्या
सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीम ५
मिली प्रति लिटर
पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
 घाटेअळी
लहान अवस्थेत असताना एचएएनपीव्ही ५०० एल ई १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्राम
निळ टाकुन सायंकाळी फवारणी करावी.
 जर
कीडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन
बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९
.३५
एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८
.
एससी २.५ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
. कीटकनाशकाचे
प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.
 शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्माहातमोजे
व तोंडावर मास्कचा वापर करावा तसेच घुटका
, तंबाखु खाऊ
नये व बीडी पिऊ नये.


व्हॉट्सॲप ग्रुप
ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप
साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड अर्ज
करण्यास सुरुवात झाली…

* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 25/11/2022

error: Content is protected !!