हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन | हरभरा मर रोग नियंत्रण | Gram Crop Wilt Control and Water Management

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन | हरभरा मर रोग नियंत्रण | Gram Crop Wilt Control and Water Management

हरभरा पिकातील पाणी व्‍यवस्‍थापन : Water Management in Gram Crop


हरभरा Gram Crop हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असणारे रब्बी हंगामातील पीक आहे. हरभरा पिकाला साधारण पणे 25 सें.मी पाण्याची
आवश्यकता असते
. हरभरा पिकाची पेरणी झाल्यानंतर
एक हलके पाणी द्यावे त्यामुळे उगवण
चांगल्या
प्रकारे
होते. मध्यम जमिनी मध्ये 25 ते 30 दिवसांच्या कालांतराने
पहिले पाणी द्यावे त्यानंतर 45 ते 50 दिवसांनी 2 रे पाणी आणि आवश्यकता भासल्यास 3 रे पाणी हे 65 ते 70 दिवसांनी देण्यात
यावे
.

 

जमिनीच्या मगदुरानुसार आणि आवश्यकतेनुसार हरभरा पिकास Gram Crop
पाणी द्यावे. जमिनीत भेगा पडण्यास सुरू होण्याआधी पाणी द्यावे
कारण मोठया प्रकारच्या भेगा पडल्यानंतर पाणी दिल्यास जमिनीत खूप
पाणी बसते आणि
त्या अति पाण्यामुळे हरभरा उमळून जाऊ शकतो.
पिकात पाणी साचून राहिल्यास मूळकुज रोगाने
हरभरा पिकाचे नुकसान होते.

 

हरभरा पिकास Gram
Crop एक पाणी दिल्यास
30 टक्के उत्पादनात वाढ पाहायला मिळते आणि तसेच दोन
पाणी दिल्यास
60 टक्के
उत्पादनात वाढ
होते आणि तीन पाणी
देण्यात आले टीआर उत्पादनात दुप्पट वाढ पाहायला मिळते. हरभरा
पिकास फुलोरा ते दाणे भरण्‍याचा कालावधी
मध्ये पाण्‍याची जास्‍त आवश्‍यकता असते. हरभरा पिकाच्‍या पाणी
देण्‍याच्‍या
दोन मुख्‍य अवस्‍था आहेत. (1)
फांद्या फुटताना
(2) घाटे भरताना पाण्‍याच्‍या पाळ्या देणे गरजेचे असते. शास्वत सिंचनाची
जरी व्‍यवस्‍था असेल तरी
या पिकास
अतिशय हलके पाणी द्यावे. 


हरभरा पिकास पाणी देण्‍याच्या आधुनिक/नवीन पद्धती

हरभरा पिकास पाणी देण्‍याच्‍या नवीन प्रचलित पद्धतीच्‍या तुलनेत तुषार सिंचन व ठिबक सिंचन
पद्धतींना
खूप महत्‍त्‍व आहे. या प्रकारच्या आधुनिक पद्धतीमुळे
कमी पाण्‍यात जास्‍त क्षेत्र ओलिताखाली आणता
येऊ शकते. या पद्धतीमध्‍ये
तुषार सिंचना
मध्ये अंदाजे 25-30 % पर्यन्त तर ठिबक सिंचना मध्ये अंदाजे 35-50% पाण्‍याची बचत होते आणि या आधुनिक सिंचन पद्धतीमुळे पीक उत्‍पादनात अंदाजे 15-20% वाढ होऊ शकते तसेच या पद्धतीने सिंचन पाण्‍यासोबत पिकांना
खते देखील देता
येतात.

 


सिंचना द्वारे द्यावयाचे खत आणि बुरशिनाशक :

हरभरा पिकामध्ये
तुषार सिंचन द्वारे पंपाच्या सहाय्याने बुरशीनाशक मिसळून आळवणी करावी
किंवा
NPK 10:26:26 आणि रोको हे बुरशीनाशक 35 दिवसांनी तुषार ने पाणी देण्याच्या अगोदर शेतात शिंपडून
पाणी द्यावे
. यामुळे हरभरा पिकांतील मर रोग नियंत्रणात येतो आणि उत्पादनात वाढ निश्चित पाहायला
मिळते.

 

हरभरा पिकास तुषार सिंचन ने पाणी देताना काळजी घेतली पाहिजे की पाण्याची
पाळी हि फुले येण्या
च्या अगोदर घेणे अतिशय महत्वपूर्ण आहे अन्यथा पाणी दिल्यास फुले न लागता
पुन्हा एकदा वाढीचा काळ सुरू
होऊ शकतो
त्यासाठी पाण्याचे नियोजन करावे करणे महत्वाचे आहे.


अधिक वाचा :

* फळबाग
लागवड अर्ज करण्यास सुरुवात झाली…

* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 25/11/2022

* कांदाचाळ लाभार्थी
निवड यादी

* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 23 नोव्हेंबर 2022

* एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान
कृषि यंत्रे सोडत यादी
17/11/2022

* पॅक हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022

* तुषार,
ठिबक सोडत 17/11/2022

error: Content is protected !!