जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न | कृषि विभाग, गंगाखेड | Gangakhed Field Visit and Discussion Programme

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न | कृषि विभाग, गंगाखेड | Gangakhed Field Visit and Discussion Programme


कृषि
विभाग (Krishi Vibhag) यांच्याकडून प्रत्येक महिन्यामध्ये जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट
ही विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येते. त्यानुसार जानेवारी 2023 या
महिन्याचे मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम हा परभणी जिल्ह्यातील
गंगाखेड तालुक्यामध्ये आज दि 24 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाला.

 

जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न | कृषि विभाग, गंगाखेड | Gangakhed Field Visit and Discussion Programme
प्रक्षेत्र भेट दुसलगाव, ता. गंगाखेड


प्रक्षेत्र
भेटीची सुरुवात ही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय
, परभणी येथून करण्यात आली. यावेळी कृषि विभागाचे श्री बनसावडे पी बी, तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड, डॉ. गडदे जी डी, कृषि विद्यावेत्ता, वनामकृवि, परभणी, प्रा. अमित
तुपे
, वनामकृवि, परभणी, डॉ. जगताप एस एन, तंत्र अधिकारी, श्री देशमुख आबासाहेब, तालुका कृषि अधिकारी, पालम, श्री नांदे सर, कृषि
अधिकारी
, पाथरी, कु. पौळ एस जि, मंडळ कृषि अधिकारी, गंगाखेड,
श्री. बोबडे आर डी
, मंडळ कृषि अधिकारी,
रानीसवारगाव
, तसेच कृषि विभागातील श्री चव्हाण बी जी, श्री देशमुख एम एस, श्री टकले आर बी, श्री पाटील शंकर, श्री बेले जि एम, श्री मतलाकुटे व्ही टी, श्री ठाकरे एन एस, श्री सोनटक्के सर हे उपस्थित होते.


प्रक्षेत्र
भेटी दरम्यान गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला येथील प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मण
मुरकुटे यांच्या शेतावरती पेरु
, कागदी लिंबू, चिकू फळबागेची पाहणी करण्यात आली.

 

मार्गदर्शन करताना डॉ. अमित तुपे व इतर अधिकारी 

प्रक्षेत्र भेट झोला पिंपरीत्यानंतर, इसाद येथे श्री रामप्रसाद सातपुते यांच्या शेतावरती ज्वारी पिकाची पाहणी
करून कीड व रोग नियंत्रण विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 

प्रक्षेत्र भेट इसाद


पुढे, तालुक्यातील दुसलगाव येथे श्री गणेश नागोराव सुक्रे यांच्या शेतावरील
2.30 हे वरील चक्री (खरबूज) या पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रा अमित तुपे
सर यांनी उपस्थित शेतकर्‍यांना पिकातील कीड व रोग नियंत्रण
,
अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील खरबूज उत्पादक
शेतकरी हे उपस्थित होते
.

 

प्रक्षेत्र भेट दुसलगाव


प्रक्षेत्र भेट दुसलगाव

 


मार्गदर्शन करताना डॉ. तुपे सर
त्यानंतर, तालुक्यातील जवळा रु येथे शेख सलीम यांच्या शेतावरती चर्चासत्राचे आयोजन
करण्यात आले. यावेळी श्री देशमुख आबासाहेब
, तालुका कृषि
अधिकारी
, पालम यांनी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत सर्व शेतकरी
योजनांची माहिती दिली. तसेच
, आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य
वर्षानिमित्त उपस्थित मान्यवरांनी बाजरी
, रागी, ज्वारी, नाचणी चे आहारातील महत्व विषयी मार्गदर्शन
केले. त्यानंतर जवळा येथील पॅक हाऊस कामाची पाहणी करण्यात आली.

 

चर्चासत्र, जवळा रु


 

चर्चासत्र, जवळा रु


 

चर्चासत्र, जवळा रु


प्रक्षेत्र भेटीचा
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषि विभागातील श्री चव्हाण बी जी
, श्री
देशमुख एम एस
, श्री टकले आर बी, श्री
पाटील शंकर
, श्री बेले जि एम, श्री
मतलाकुटे व्ही टी
, श्री ठाकरे एन एस, तसेच गावातील बाळासाहेब सुक्रे, संतोष लंगोटे, शेख सलीम, माऊली कदम यांनी अथक परिश्रम
घेतले.
error: Content is protected !!