परभणी जिह्यात रुजतोय “स्मार्ट कॉटन” | The Smart Cotton Project Parbhani

 

परभणी जिह्यात रुजतोय "स्मार्ट कॉटन" | The Smart Cotton Project Parbhani

स्व. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन
(स्मार्ट) प्रकल्पांतर्गत 
परभणी जिह्यात
रुजतोय “स्मार्ट कॉटन”


लहान व सीमांत शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या
सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक
मुल्यसाखळी
विकासासाठी मदत देण्याकरिता उभारण्यात आलेल्या स्मार्ट कॉटन(Smart Cotton) प्रकल्प पहिल्याच वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुजला
आहे. या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील
4 तालुक्यामध्ये एकजिनसी कापसाची लागवड करण्यात अली असून
त्या मध्ये शेतकऱ्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. हा प्रकल्प
2021 ते 2026-27 अश्या सात वर्षा करिता राबविला जात आहे.


The Smart Cotton Project Parbhani

Read more

मौजे पिंपरी ता गंगाखेड येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत कापूस पिकाची शेतीशाळा संपन्न | Smart Cotton Farmers Field School at Pimpri Gangakhed, Dist. Parbhani

 

 दि 21/09/2022, वार बुधवार: गंगाखेड तालुक्यातील मौजे पिंपरी या गावामध्ये स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत कापूस पिकाची शेती शाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी या शेतीशाळा वर्गात उपस्थित होते.

 

       कापूस शेती शाळा वर्गामध्ये कृषी सहाय्यक श्री मतलाकुटे व्ही टी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कापूस पिकावरील बोंडआळी व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी कापूस पिकामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर कसा करावा आणि त्याचे फायदे व तसेच कामगंधे सापळे बसवण्याची प्रात्यक्षिक करून दाखविली.

 

       त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रण करिता करावयाच्या उपायोजना आणि पुढील फवारणी नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.

 

       स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत शेती शाळा वर्गाचे आयोजन हे गावातील कृषी मित्र यांनी केले आणि या कार्यक्रमास गावातील कापूस उत्पादक शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे अधिक छायाचित्रे:

मौजे पिंपरी ता गंगाखेड येथे  स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत कापूस पिकाची शेतीशाळा संपन्न | Smart Cotton Farmers Field School at Pimpri Gangakhed, Dist. Parbhani

Read more

error: Content is protected !!