रब्बी हंगाम 2023 ई पीक पाहणी मुदतवाढ | आता “या” तारखेपर्यंत करता येणार पीक पाहणी | Rabbi Season E Peek Pahani deadline

 

महाराष्ट्र राज्यामध्ये ई पीक पाहणी ((E Peek Pahani) ची माहिती मोबाईल ॲप द्वारे गाव नमुना बारा मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप (E Peek Pahani) उपलब्ध करून देऊ मार्गदर्शक प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.

 


ई पीक पाहणी एप्लीकेशन  (E Peek Pahani) हे टाटा ट्रस्ट (Tata Trust) व महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) यांच्यातील सामंजस्य करार अन्वये टाटा ट्रस्ट ने विकसित केले आहे.

 


रब्बी हंगाम 2023 साठी ई पीक पाहणी करण्यासाठी ची मुदत दि. 31 जानेवारी 2023 होती  परंतु मान्सून उशिरापर्यंत लांबल्यामुळे  रबी हंगामाची उशिराने पीक पेरणी झालेली आहेतसेच जिल्हा पातळीवरून क्षेत्रीय अधिकारी यांनी रब्बी हंगाम 2023 करिता ई पीक पाहणी करण्याकरिता मुदतवाढ मिळावी अशी मागणी केल्याने रब्बी हंगाम 2023 करिता मोबाईल अँप द्वारे ई पीक पाहणी करण्यासाठी दि. 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

 


तर, सर्व शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पिकांची ई पीक (E Peek Pahani) पाहणी ही दि. 15 फेब्रुवारी 2023 पर्यन्त पूर्ण करून घ्यावी.


11 जानेवारी 2023 रोजी अद्ययावत ई पीक पाहणी मोबाइल अॅप्लिकेशन : डाऊनलोड करा

 

ई पीक पाहणी करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धती : पहा ई पीक पाहणी

Read more

ई पीक पाहणी अंतिम मुदत | नवीन ॲप अपडेट | e peek pahani last date 15 October

  महाराष्ट्र राज्यामध्ये ई पीक पाहणी (e peek pahani) ची माहिती मोबाईल ॲप द्वारे गाव नमुना बारा मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप (e peek pahani) उपलब्ध करून देऊ मार्गदर्शक प्रकल्प महाराष्ट्र राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे.   ई पीक पाहणी एप्लीकेशन  (e peek pahani) हे टाटा ट्रस्ट (Tata Trust) व महाराष्ट्र शासन … Read more

error: Content is protected !!