बीबीएफ पेरणी यंत्र आहे का? नसेल तर हे करा | BBF seed drill | Alternative to BBF planter

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BBF SEED DRILLपिकाच्या हमखास वादीसाठी रुंद वरंबा व सरी पद्धत म्हणजेच बोबीएफ(BBF) द्वारे पेरणी पद्धत फायदेशीर च आहे.

पिकांच्या लागवडीसाठी बीबीएफ यंत्र आणि त्याची वैशिट्ये कोणती ते जाणून घेऊ
• आवश्यकतेनुसार पेरणीची खोली ही कमी जास्त करण्याची व्यवस्था यंत्र मध्ये आहे. तसेच पेरणी करताना दोन ओळींमधिल अंतर, दोन रोपांतील अंतर कमी जास्त करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
• बियाणे पेरणी वेळेस त्यासोबत रासायनिक खते बियाण्याच्या खाली देण्याची सोय असते. या यंत्राद्वारे पाडलेल्या स-यांमधून पिकांना आवश्यक असेल तेंव्हा पाणी देता येते. 


बीबीएफ पेरणी पद्धतीचे वैशिट्ये आणि फायदे:

• आपल्या उत्पादनामध्ये १० ते २५ टके पर्यंत वाढ पाहायाला मिळते.
• बियाणांची १५ ते२० टक्के पर्यत बचत होते कारण आपण टोकन पद्धतीने लागवड केली जात असल्याने दोन ओळीतील आणि रोपांमधिल अंतर सारखे राहते,
• बीबीएक पद्धतीमध्ये पडणाया पावसाचे पाणी जमिनीत मुरवून नातीत ओलावा जास्त काळ टिकवून ठेवले जाते. २० ते २५ टक्के जास्तीचे पाणी हे जमिनीती साठविले जाते.
• बीबीएफ पद्धतीमुळे जास्त पाउत झाल्यास ते जास्त झालेले पाणी पिका मधील स-यांमधून वाहून नेले जाते व पिक पाण्यात बुडून किंवा पाणी साचल्यामुळे नुकसान होण्यापासून बचाव होतो.
• उंच वाफ्यावर पिकाची लागवड केल्याने पाणी साचल्यामुळे होणा-या मुळ व खोड रोगाचा प्रादुर्भाव टाळला
जातो.
• पिकांमधे हवा खेळती रहाते व सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो त्यामुळे रोग व किडीचा प्रादुभांच कमी
होतो. तसेच या यंत्राद्वारे एका दिवसात १0 ते १२ एकर क्षेत्रावर पेरणी करता येते.

जर बीबीएफ पेरणी यंत्र नसेल तर हे मग असे करा नियोजन , बीबीएफ सोयाबीन पेरणी यंत्र, सोयाबीन पेरणी soyabin perni


जर आपल्याकडे बीबीएफ़ पेरणी यंत्र उपलध नसेल तर अशा प्रकारे करा नियोजन:


• ज्यांच्याकडे बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध होऊ शकत नाही त्यांनी ट्रॅक्टर चलीत यंत्राचे शेवटचे दोन फन काढून त्याठिकाणी पंजीचे फाळ लावावा
• ज्यांना या पध्दतीने पेरणी करणे शक्य नसेल त्यांनी पिकांच्चा ३,४,५ ओळी नंतर एक ओळ रिकामी ठेऊन पट्टा पध्दतीने पेरणी करावी व नंतर या रिकाम्या ओळीत जाणकुळाला दोरी बांधुन मृत सरी तयार करावी.
error: Content is protected !!